उत्तर प्रदेशात पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार!

वृत्तसंस्था
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - पाच वर्षाच्या निरागस बालिकेवर एका तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - पाच वर्षाच्या निरागस बालिकेवर एका तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुजाहिदपूर येथील एका तरुणाने पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीला शुक्रवारी उसाच्या शेतात नेले. त्यानंतर तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिस निरीक्षक (ग्रामीण) विनीत भटनागर यांनी दिली. घटनास्थळी मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील कलम 376 (बलात्कार) नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या भयानक घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पोलिस स्थानकाबाहेर गर्दी करत या प्रकरणी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली.

ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही अशीच घटना समोर आली होती. पाच वर्षांच्या बालिकेवर राजधानी दिल्लीत शेजारी राहणाऱ्या 32 वर्षाच्या नराधमाने अपहरण करून बलात्कार केला होता. मद्यधुंद अवस्थेतील नराधमाने घराच्या बाहेर खेळत असलेल्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले होते.

Web Title: Rape on 5 year minor girl in Uttar Pradesh