Gurmeet Ram Rahim : बलात्कारी बाबाचा सत्संग; "पिताजी, आशीर्वाद द्या" म्हणत भाजपाचे बडे नेते सहभागी

आगामी निवडणुकांशी या सत्संगाचा संबंध जोडला जात आहे.
Gurmeet Ram Rahim
Gurmeet Ram RahimSakal

कथित धर्मगुरू आणि बलात्काराच्या आरोपाखाली गजाआड असलेला गुरमीत राम रहीम याची काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर मुक्तता झाली आहे. राम रहीमने आता पुन्हा एकदा आपले सत्संग घेण्यास सुरुवात केली आहे. एका ऑनलाईन सत्संगामध्ये तर भाजपाच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली आणि त्याच्याकडून आशीर्वादही घेतला.

बाबा राम रहीमचा ऑनलाईन सत्संग सुरू होता. त्यामध्ये हरियाणातले काही भाजपाचे मोठे नेते सहभागी झाले होते. करनालच्या महापौर रेणू बाला याही इथं सहभागी झाल्या होत्या. त्यांनी राम रहीम यांचा उल्लेख पिताजी असा केला असून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. या सत्संगाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र राणा, उपमहापौर नवीन कुमार, राजेश कुमार हे भाजपा नेतेही उपस्थित होते.

हरियाणामध्ये लवकरच पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. त्याआधीच राम रहीम पॅरोलवर सुटला, या सगळ्याचा संबंध जोडला जात आहे. आदमपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. इथं राम रहीमचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे भाजपा नेते यात सहभागी झाले होते, अशी चर्चा आहे. दरम्यान, भाजपा नेत्यांनी मात्र या चर्चा फेटाळल्या आहेत. बाबाजींनी सत्संगाचं निमंत्रण दिलं होतं, या ऑनलाईन सत्संगाला अनेक लोकांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. त्याचा निवडणुकीशी काही संबंध नाही, असं भाजपा नेते राजेश कुमार यांनी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com