परदेशी महिलेवर गोव्यात बलात्कार

सुभाष महाले
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

काणकोण : काणकोणात परदेशी पर्यटक महिलेवर पाळोळे रस्त्याच्या निर्जनस्थळी आज (ता. 20) सकाळी अज्ञाताने बलत्कार करून तिच्याकडील 20 हजार रूपयाची रोकड लंपास केली. त्याचप्रमाणे कपडे व अन्य मौल्यवान वस्तूही त्याने पळवल्या आहेत.

ही घटना सकाळी सहाच्या सुमारास घडली. या महिलेचे तीन आठवडे पाळोळे येथे वास्तव्य होते. आज सकाळी पाळोळे येथून ती काणकोण रेल्वेस्टेशनवर थिवीला जाण्यास गेली होती. मात्र रेल्वेला उशीर असल्याने ती पुन्हा पाळोळेला परत येताना येथील टेलिफोन एक्सेंजच्या इमारतीसमोर असलेल्या निर्जन जागेत नेऊन अज्ञाताने तिच्यावर बळजबरी केली.

या महिलेने स्वतः काणकोण पोलिसात येऊन तक्रार केल्यानंतर तातडीने दक्षिण गोव्याची पोलिस यंत्रणा सक्रिय होऊन अज्ञाताचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाला. त्यासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले.

Web Title: rape on foreign tourist in Goa