बलात्कार हा समाजजीवनाचा भागच - हरियाना पोलिस

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

हरियाना - पाच दिवसात बलात्काराच्या सहा घटना घडल्याने हरियानामध्ये भीतीचे वातावरणा आहे. त्यातच वाढत्या बलात्काराच्या घटनांवर हरियानाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आर. सी. मिश्रा यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. बलात्कार हा समाजजीवनाचा भागच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा घटना आजपासून नव्हे, तर बऱ्याच काळापासून घडत आहेत,' असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.

या व्यक्तव्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. ''अनंत काळापासून या घटना घडत आहेत. अशा घटना रोखण्याचे काम पोलिस करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात येईल'', असे विधान मिश्रा यांनी केल्याने राजस्थानात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. 

दरम्यान, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकांची स्थापना केली आहे. परंतु, काही सामाजिक संघटनांनी हरियाना सरकारच्या विरोधात दिल्लीत जोरदार निदर्शने केली आहेत.

Web Title: Rape Has Always Been a Part of Society: Haryana ADGP