उत्तराखंडमध्ये 11 वर्षीय मुलाचा तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार

उत्तराखंडमध्ये 11 वर्षीय मुलाचा तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये एका 11 वर्षीय मुलाने तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार केला. ही घटना डेहराडूनच्या दालानवाला भागात घडली. या घटनेने संपूर्ण डेहराडूनमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

आरोपी मुलाने मिठाई देण्याच्या बहाण्याने पीडित बालिकेला आपल्या घरी गेले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित बालिकेची वडिल राजपूर रोडवर एका हॉटेलमध्ये नोकरी करतात तर आई घरकाम करते. पीडित बालिकेचे आई-वडिल त्यांच्या तीन मुलांना घरी ठेऊन कामासाठी घराबाहेर पडले होते. घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

''आरोपी हा घराजवळच राहतो. त्याने मुलीला खाऊचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले व तिथे बलात्कार केला'', असा आरोप बालिकेच्या आईने केला.  

दरम्यान, पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात विरोधात भा.दं.सं कलम 376 आणि पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com