Driver Beating
ESakal
देश
Crime: धक्कादायक! अवघ्या १६ रुपयांवरून वाद उफाळला अन्...; प्रवासी महिलेचे रॅपिडो ऑटो चालकासोबत धक्कादायक कृत्य
Hyderabad Driver Beating Video: एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. यात १६ रुपयांवरून झालेल्या वादातून एका प्रवासी महिलेने रॅपिडो ऑटो चालकासोबत धक्कादायक कृत्य केले आहे.
तेलंगणातील हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने रॅपिडो ऑटो चालकावर संताप व्यक्त केला. आधी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर त्याला शिवीगाळ केल्याचे दिसून आले आहे. यानंतर तिने त्याच्यावर आपल्या चपलेने मारहाण केली आहे. लोकांनी ही घटना त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर शेअर केली.