बलात्कार करणाऱयांना जिवंत जाळले पाहिजे: काँग्रेस आमदार

geniben thakor
geniben thakor

अहमदाबादः बलात्कार करणाऱयांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले पाहिजे, असे काँग्रेसच्या आमदार गेनीबेन ठाकोर यांनी म्हटले आहे. ठाकोर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुजरातमधील साबरकंथा येथे दोन आठवड्यांपूर्वी 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. यावर बोलताना ठाकोर म्हणाल्या, बलात्कारातील आरोपींना पोलिसांकडे सोपवण्याऐवजी तिथल्या तिथेच पेट्रोल टाकून जिवंत जाळले पाहिजे.’

ठोकर यांनी 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांना स्थानिक महिलांना गराडा घातला होता. महिलांशी त्यांनी संवाद साधताना बलात्कार करणाऱयांना जिवंत जाळले पाहिजे, असे म्हटले आहे. त्यांचा संवाद मोबालईमध्ये कैद झाला असून, सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ 30 सेंकदाचा आहे.

व्हिडिओमध्ये ठाकोर महिलांशी बोलताना म्हणतात की, 'भारतात प्रत्येकाला कायदेशीर प्रक्रियेतून जाव लागते. बलात्कारासारख्या जेव्हा अशा घटना घडतात तेंव्हा 55, 100, 50 किंवा 150 लोकांनी एकत्र येऊन त्याच दिवशी बलात्कारातील आरोपीला जिवंत जाळलं पाहिजे. त्याला मारुन टाका, पोलिसांकडे सोपवू नका’.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देताना ठाकोर म्हणाल्या, बलात्कारामुळे संतप्त झालेल्या महिलांना आपण शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. आरोपीला पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. हा व्हिडीओ माझ्या निवासस्थानी शूट करण्यात आला आहे. मी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी हे वक्तव्य केलेले नाही. जवळपास 100 महिला तेथे जमल्या होत्या. त्यांना शांत करण्यासाठी बोलले असून, दुसरा कोणताही हेतू नव्हता.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com