मुंबईची राशी बनली 'मिस टीन इंटरनशनल इंडिया 2020', दुबईत करणार भारताचे प्रतिनिधित्व

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 February 2021

दिल्ली येथे पर पडलेल्या स्पर्धेत राशीची मिस टीन म्हणून निवड करण्यात आली. आता तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिस टीन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. माझ्या डोक्यावर जेव्हा मिस टीन इंटरनॅशनल इंडिया 2020 चा क्राऊन घातला गेला तेव्हा खूप आनंदी झाले असं राशीने म्हटलं.

मुंबई - दिल्ली येथे पर पडलेल्या स्पर्धेत राशीची मिस टीन म्हणून निवड करण्यात आली. आता तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिस टीन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. माझ्या डोक्यावर जेव्हा मिस टीन इंटरनॅशनल इंडिया 2020 चा क्राऊन घातला गेला तेव्हा खूप आनंदी झाले असं राशीने म्हटलं.

कधीही, कोठेही आंदोलन अशक्य; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

राशी म्हणाली की,'मी तेव्हा  खूप आनंदी झाले होते, मात्र समाधानी नव्हते. तेव्हा मला प्रकर्षाने जाणीव झाली की या सन्मानाने माझ्या जबाबदारीत खूप मोठी वाढ झाली आहे. मला आता समाजासाठी काही करायचे आहे. कारण सन्मान हा केवळ आनंदच देत नाही तर तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव वेळोवेळी करून देत राहणार असतो.' 18 वर्षांची राशी परसरामपुरिया ही मुंबईची आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतातील सौंदर्य स्पर्धेत मिस टीन या सोर्धेचे एक अनन्य महत्व आहे. या स्पर्धेत मिस टीन इंडिया इंटरनॅशनाल , मिस टीन इंडिया युनिव्हर्स , मिस टीन इंडिया अर्थ यांची निवड केली जाते. यासाठी भारतातून व जगभरातून भारतीय असलेल्या मुलीना सहभाग घेता येतो. 

राशी ही नरसी मोनजी बिझनेस मनेजमेंट महाविद्यालयाची पदवीधारक विद्यार्थिनी आहे. राशी नृत्यात पारंगत असून तिने या पूर्वी दोन वेळा राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत सहभागी होत आपले नाव विजेता म्हणून झळकाविले आहे. 25 जानेवारीला पर पडलेल्या मिस टीन स्पर्धे नंतर राशीने आंतरराष्ट्रीय पातळीवर एच आय व्ही मुक्त जग या कार्यासाठी भविष्यात स्वतःला झोकून द्यायचे ठरविले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राशी एच आय व्ही ने ग्रासित मुलींसाठी कार्य करणार आहे.

'तिरस्कार आता क्रिकेटपर्यंत पोहचला'; वासीम जाफरसाठी राहुल गांधींची बॅटिंग

लवकरच दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मिस टीन स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. रविवारी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात राशीला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी माजी मिस टीन इंडिया राहिलेल्या प्रांजळ प्रिया , ऐश्वर्या विनू नायर , मानिश्का गोयल , रितू गढवी , आस्था दवे , शुभांगी देसाई , सेजल कुमार , देबप्रिया शर्मा , रिया चौधरी यांच्यासह स्पर्धेचे ज्युरी पुष्कर मलिक , निखील आनंद , कार्तिकेय अरोरा , डॉ . वरून कट्याल , तसेच सौंदर्य स्पर्धा मधील विविध नामांकित व्यक्ती सहभागी होणार आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rashi won miss teen international india 2020 in delhi