राष्ट्रपतींना मंदिरात दुय्यम वागणूक दिल्याचे उघड

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

राष्ट्रपती कोविंद पत्नी सवितासह 18 मार्च 2018 ला पुरी येथील जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यादरम्यान सेवेकऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले होते.

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद पत्नी सविता कोविंद यांच्यासोबत पुरी येथील जगन्नाथ मंदिरात गेले असता त्यांच्यासोबत भेदभाव करत त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला. या प्रकारामुळे सगळीकडे चर्चा सुरु असून, राष्ट्रपती भवन प्रशासनाकडून पुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात आले. मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक आयएएस अधिकारी प्रदीपकुमार मोहापात्रा यांनी राष्ट्रपतींना दुय्यम वागणूक देण्यात आल्याचे मान्य केले. 

राष्ट्रपती कोविंद पत्नी सवितासह 18 मार्च 2018 ला पुरी येथील जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यादरम्यान सेवेकऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले होते. तसेच त्यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता यांना धक्काबुक्कीही करण्यात आली होती. या प्रकरणी 20 मार्चला मंदिर प्रशासनाची बैठकही घेण्यात आली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने राष्ट्रपतींसोबत भेदभाव आणि त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचे कबूल केले.

Web Title: Rashtrapati Bhavan Expresses Anger Over Security Breach Of President Ramnath Kovind In Puri Jagannath Temple