
Crime : उंदराची निर्घृण हत्या; पोलिसांत चक्क दाखल झाली तक्रार
लखनऊ : उत्तरप्रदेशच्या बदाऊ जिल्ह्यात एका उंदराची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हे ऐकून आपल्याला कदाचित हसू येईल पण हे खरं आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मनोज कुमार या आरोपीविरोधात तक्रार केली आहे. तर उंदराच्या हत्येचे व्हिडिओ तक्रारदाराने शूट केले आहेत.
हेही वाचा: Pratik Patil Marriage Photo : NCPच्या पाटलांच्या मुलाचा शाही लग्नसोहळा
दरम्यान, हितेंद्र शर्मा यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून वीटेला बांधून पाण्यात बुडून उंदराला मारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारदार शर्मा हे पीपल्स फॉर अॅनिमल्स या संस्थेसाठी काम करतात. आपण नाल्यात उडी मारून या उंदराला बाहेर काढलं पण तो वाचू शकला नाही. पशू क्रूरता निवारण कायद्यानुसार सदहर इसमावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शर्मा यांनी केली आहे.
अधिक माहितीनुसार, पोलिसांकडून आरोपीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र, तक्रारीच्या आधारावरून त्यांना केवळ चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. आरोपीची प्राथमिक चौकशी करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.