
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रतन टाटांचे ट्वीट; म्हणाले...
नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदासंदर्भात सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. टाटा समूहासोबतच्या वादाच्या संदर्भात न्यायाधीशांनी ही पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली. दरम्यान, या निकालानंतर रतन टाटा (Ratan Tata) यांनी ट्वीट करत त्यांनी निकालाचे कौतूक करत आपण कृतज्ञ असल्याचे म्हटले आहे. (Ratan Tata Cyrus Mistry )
पुनर्विलोकन याचिकेत कोणतेही कारण सापडले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2021 मध्ये मिस्त्री यांच्या विरोधात निकाल दिला होता. त्यानंतर मिस्त्री यांच्यातर्फे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.
हेही वाचा: ज्ञानवापी मशिदीत त्रिशूळ, डमरू दिसलं; वकिलांचा दावा
नेमकं प्रकरण काय?
सायरस मिस्त्री यांना 2016 साली टाटा समूहाच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर मिस्त्री यांच्यातर्फे या प्रकरणाला आव्हान देण्यात आले होते. तर, डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी नॅशनल कंपनी लॉ अपिलिएट ट्रिब्युनालने अशा पद्धतीने पदावरून काढण्याच्या निर्णयाला चुकीचे ठरवले होते. तसेच संबंधित पद मिस्त्री यांना परत देण्यात यावे असेही सांगितले होते. यानंतर टाटा समूहाने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यात न्यायालयाने नॅशनल कंपनी लॉ अपिलिएट ट्रिब्युनालच्या आदेशाला स्थगिती देत 26 मार्च 2021 रोजी टाटा समूहाच्या बाजूने निर्णय दिला होता. यात न्यायालयाने मिस्त्री टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर राहू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते.
हेही वाचा: कारावासाच्या शिक्षेनंतर सिद्धूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
निकालानंतर रतन टाटांकडून ट्वीट
दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ट्वीट करत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच "सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आणि कायम ठेवलेल्या निकालाबद्दल कृतज्ञ असल्याचे म्हणत आजचा निकाल हे आपल्या न्यायव्यवस्थेची मूल्य प्रणाली आणि नैतिकता मजबूत करते, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
Web Title: Ratan Tata Says Grateful As Sc Rejects Plea To Review Order On Cyrus Mistry
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..