रतन टाटांची भावूक पोस्ट, म्हणतात 'माझी सुंदर ऑनलाइन फॅमिली!'

वृत्तसंस्था
Wednesday, 12 February 2020

काल टाटांनी एक फोटो शेअर केलाय जो प्रचंड व्हायरल होतोय. ८२ वर्षांच्या रतन टाटांचा हा उत्साह बघून सगळेच भारावून गेलेत. या फोटोला त्यांनी भावूक कप्शन दिलंय जे त्यांच्या इन्स्टाग्राम फोलोअर्ससाठी आहे.

नवी दिल्ली : टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा सध्या सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. कधी त्यांचे तरूणपणीचे फोटो तर कधी सामाजिक घडामोडींवर भाष्य करणारे फोटो ते शेअर करतात. ज्यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. अशातच काल त्यांनी एक फोटो शेअर केलाय जो प्रचंड व्हायरल होतोय. ८२ वर्षांच्या रतन टाटांचा हा उत्साह बघून सगळेच भारावून गेलेत. या फोटोला त्यांनी भावूक कप्शन दिलंय जे त्यांच्या इन्स्टाग्राम फोलोअर्ससाठी आहे. 

रतन टाटा हॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाहीत; त्यांचा तरुणपणीचा फोटो पाहाच!

माझी सुंदर ऑनलाइन फॅमिली!
टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांच्याशी इन्स्टाग्रामवर जोडल्या गेलेल्यांची (फॉलोअर) संख्या 10 लाखांवर पोचली आहे. त्यानंतर सर्वांना धन्यवाद देताना त्यांनी स्वत:चे एक छायाचित्रही पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, की "मी आताच पाहिले की या पेजशी जोडल्या गेलेल्या चाहत्यांच्या संख्येने मैलाचा टप्पा गाठला आहे. जेव्हा मी इन्स्टाग्रामशी जोडला गेलो होतो, तेव्हा असे सुंदर ऑनलाइन कुटुंब अस्तित्वात येईल, अशी अपेक्षा केली नव्हती आणि त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो. मला असे वाटते की, इंटरनेटच्या या जमान्यात तुम्ही जोडले जात असलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा त्या नात्याची गुणवत्ता ही सर्वात महत्त्वाची. तुमच्या या दुनियेचा एक भाग असणे आणि तुमच्याकडून शिकणे हे खूपच रोमांचक आहे आणि मला त्यातून खूप आनंद मिळतो. तुमच्यासोबतचा माझा प्रवास असाच सुरू राहील, याची मला आशा आहे.' अशा शब्दांत टाटा यांनी आपल्या युजर्सचे आभार मानले आहेत. त्यांच्या या पोस्टला जवळपास ४ लाख लाईक्स आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रतन टाटांची इन्स्टाग्रामवर एंट्री

याच फोटोवर एका तरूणीने 'Congratulatuions Chhotu' अशी कमेंट केली आहे. या कमेंटवरून त्या तरूणीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. रतन टाटांसारख्या आदर्श व्यक्तिला छोटू कशा म्हणू शकतेस, अशा शब्दांत तिला सुनावले मात्र, यात मध्यस्थी करत चक्क टाटांनी या कमेंटवर रिप्लाय देत सांगितले की, 'आपल्या प्रत्येकात लहान मूल दडलेलं असतं. कृपया या तरूणीस सन्मानपूर्वक वागणूक द्या.' या तरूणीने टाटांवर असलेल्या प्रेमापोटी असा उच्चार केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratan Tata Shares his photo on Instagram