

BJP MP Ravi Kishan Shukla addressing media after receiving a death threat; police increase security measures in Gorakhpur.
esakal
Ravi Kishan, BJP MP Gorakhpur : भाजपचे गोरखपूरचे खासदार रवी किशन शुक्ला यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बिहारच्या आरा जिल्ह्यातील जावनिया गावातील रहिवासी अजय कुमार यादव या व्यक्तीने रवी किशन यांचे सचिव शिवम द्विवेदी यांना फोन केला आणि केवळ अपशब्द वापरले नाहीत तर उघडपणे धमकी दिली की, "रवी किशन हे यादवांवर टिप्पणी करतात, म्हणून मी त्यांना गोळी घालेन."
याप्रकारानंतर, सचिव शिवम द्विवेदी यांनी गोरखपूरच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आणि आरोपींविरुद्ध लेखी तक्रार नोंदवली. ज्यामधअये रवी किशन यांची सुरक्षा वाढवण्याची आणि धमकी देणाऱ्या तरुणाला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजप खासदार आणि स्टार प्रचारक रवी किशन शुक्ला यांची सुरक्षा वाढवली जाण्याची शक्यता आहे.
तत्पुर्वी आरोपीने जेव्हा खासदार रवी किशन यांच्यावर आरोप करत, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावर सचिव शिवम द्विवेदी यांनी स्पष्टपणे सांगितले की खासदार रवी किशन यांनी कधीही कोणत्याही समुदायाविरुद्ध कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी केलेली नाही.
मात्र यानंतर आरोपी अजय यादव संतापला आणि त्याने खासदार रवी किशन यांच्यासह त्यांच्या सचिवांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, "मला तुमच्या सगळ्या हालाचलींची माहिती आहे. तुम्ही चार दिवसांत बिहारला आलात की मी तुम्हाला मारून टाकेन. याचवेळी त्याने धमकीसोबतच एक धार्मिक टिप्पणी देखील केली.
तर प्राप्त माहितीनुसार संभाषणादरम्यान, आरोपी अजय यादवने भोजपुरी गायक खेसारी लाल यादव यांच्या विधानाचे समर्थन केले ज्यामध्ये त्यांनी राम मंदिराच्या जागी रुग्णालय बांधण्याची मागणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.