Digital Rupee
Digital Rupeeesakal

Digital Rupee : उद्या सामान्य नागरिकांसाठी लाँच होणारा डिजिटल रुपया वापरायचा कसा? जाणून घ्या

भारतीय रिझर्व बँक १ डिसेंबर रोजी रिटेल डिडिटल रुपया लाँच करणार आहे. याचा पहिला पायलट प्रोजेक्ट होणार आहे.

RBI Digital Rupee : भारतीय रिझर्व बँक उद्या म्हणजे एक डिसेबरला रिटेल डिडिटल रुपया लाँच करणार आहे. याचा पहिला पायलट प्रोजेक्ट होणार आहे. यात रुपयाचं निर्माण, डिस्ट्रीब्युशन, रिटेल वापर याच्या संपूर्ण प्रक्रीयेचं टेस्टिंग केलं जाणार आहे. यापूर्वी केंद्रीय बँकेने १ नोव्हेंबरला होलसेल ट्रँझॅक्शनसाठी डिजीटल रुपया लाँच केला होता.

ठरावीक ठिकाणी सुरू होणार चलन

रिझर्व बँकने या डिजिटल करंसीला सेंट्रल बँक डिजिटल करंसी (CBDC) नाव दिलं आहे. १ डिसेंबरपासून ठरावीक ठिकाणी हा रुपया चलनात आमला जाणार आहे. यात ग्राहकापासून ते मर्चंटपर्यंत सर्वांचा समावेश असेल.

Digital Rupee
Digital Rupee : चलनी नोटांची छपाई होणार इतिहासजमा?; RBI कडून डिजिटल रुपयाची घोषणा

ई-रुपी (e₹-R) डिजिटल टोकनच काम करेल. सेंट्रल बँक डिजिटल करंसी (CBDC) भारतीय रिझर्व बँकेकडून आणल्या जाणाऱ्या करंसी नोटांचं डिजिटल स्वरुप असणार आहे. ही करंसी नोटांप्रमाणेच पूर्ण वैध समजली जाणार आहे. याचा वापर व्यवहारासाठी केला जाईल.

Digital Rupee
Digital Rupeeचा आपल्याला काय फायदा होणार? : Difference Between Crypto And Digital Rupee

कसा केला जाणार वापर?

e₹-R चं वितरण बँकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. डिजिटल वॉलेटद्वारा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला किंवा विक्रेत्याला ते देऊ शकाल. तुमच्या फोनमध्ये ज्या बँकेचं अ‍ॅप असेल त्या बँकेच्या डिजिटल वॉलेटमधून तुम्ही व्यावहारासाठी हा रुपया वापरू शकाल. यासाठी तुम्ही क्यूआर (QR) कोड्स स्कॅन करून व्यवहार करू शकता.

Digital Rupee
Rupee Bank : ‘रुपी’च्या उर्वरित ठेवीदारांना ३०० कोटी मिळणार

यात ८ बँका असतील सहभागी

पायलट प्रोजेक्टमध्ये ८ बँकांचा समावेश असणार आहे. पण पहिल्या स्तरातली सुरूवात देशातल्या चार शहरांत SBI, ICICI, यस बँक आणि IDFC फर्स्ट बँकच्या माध्यमातून होईल. यानंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक या पायलट प्रोजेक्टमध्ये सहभागी असणार आहेत.

कागदी नोटांएवढेच महत्व

या नव्या डिजिटल रुपयाला कागदी नोटेच्या रुपया एवढेच महत्व आहे. तुम्हाला हवे तर ही करंसी देऊन तुम्ही नोट घेऊ शकाल. रिझर्व बँकेने या डिजिटल करंसीला CBDC-W आणि CBDC-R अशा दोन गटात विभागण्यात आलं आहे. CBDC-W चा अर्थ होलसेल करंसी आहे. तर CBDC-R चा अर्थ रिटेल करंसी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला डिजिटल करण्यासाठी उचललेलं हे पाऊल महत्वपूर्ण समजलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com