esakal | RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

rbi governer

देशात कोरोना आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 70,78,123 इतकी झाली आहे

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे.  पण अशातच आता रिर्जव्ह बॅंक ऑफ इंडियाचे गवर्नर शक्तीकांत दास यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दलची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. याबरोबरच दास यांनी सांगितले की ते सध्या घरातच होम आयसोलेशनमध्ये जाऊन ते त्यांचे काम सुरुच ठेवणार आहेत. 

"माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पण सध्या माझी तब्येत ठीक आहे. मागील काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी. मी माझं काम यापुढेही होम आयसोलेशनमध्ये चालू ठेवणार आहे. आरबीआयमधील काम सामान्यपणे चालेल. सरकार आणि इतर अधिकारी टेलिफोन किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकतात, असं ट्विट दास यांनी केलं आहे

गेल्या 24 तासात 62,077 लोकांनी विषाणूवर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 70,78,123 इतकी झाली आहे, समाधानाची बाब म्हणजे दररोज कोरोनाग्रस्तांपेक्षा कोरोनामुक्त जास्त होत आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 6,68,154 आहे. 

हेही वाचा- Bihar Election: प्रचाराला निघालेल्या उमेदवाराची हत्या, जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू

देशातील कोरोना रिकव्हरी रेट 89.99 टक्के झाला आहे, तर सक्रिय रुग्ण 8.49 टक्के आहेत. मृत्यू दर 1.05 टक्के झाला आहे. पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे दररोज होणाऱ्या चाचण्यांपैकी सापडणारे कोरोनाबाधित रुग्ण 4.39 टक्के आहेत. भारताचा रिकव्हरी रेट इतर अनेक देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. गेल्या 24 तासाच देशात 11,40,905 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या कोविड-19 चाचण्यांची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. देशात 10,25,23,469 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

(edited by- pramod sarawale)