रिझर्व्ह बॅंकेकडे पुरेशी रोकड- जेटली

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : चलन तुटवड्याला सामोरे जाण्यास रिझर्व्ह बॅंक पूर्णपणे सज्ज असून, रिझर्व्ह बॅंकेकडे 30 डिसेंबरनंतरही पुरेल एवढा चलनसाठा आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी दिली.

अरुण जेटली म्हणाले, ""रिझर्व्ह बॅंक कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. रिझर्व्ह बॅंकेने पुरेसा चलन पुरवठा केला नाही, असे एकही दिवस घडलेले नाही. चलन वितरणात आणण्याचे प्रमाण ठरलेले असून, रिझर्व्ह बॅंक यासाठी पूर्णपणे तयार आहे. रिझर्व्ह बॅंकेकडे आजघडीला पुरेसा चलनसाठा असून, तो 30 डिसेंबरपर्यंत नव्हे तर त्यानंतरही तो पुरेल.''

"सध्या वितरणात नेमके किती चलन आहे याची आकडेवारी 30 डिसेंबरला मिळाल्यानंतर जाहीर करण्यात आला. हा जुन्या नोटा जमा करण्यासाठी शेवटचा दिवस आहे. छपाई झालेल्या नोटा टपाल कार्यालयांमध्ये गेल्या असून, त्या तेथून बॅंकांमध्ये आणि अखेर रिझर्व्ह बॅंकेकडे येणार आहेत. त्यामुळे त्यांची मोजदाद पुन्हा पुन्हा होऊन चूक होऊ शकते. त्यामुळे वितरणातील चलनाचा आकडा आताच जाहीर करता येणार आहे,'' असे जेटली यांनी सांगितले.

बॅंकेत जाऊन एकाच वेळी जुन्या नोटा जमा करणाऱ्यांना पाच हजार रुपयांची मर्यादा असणार नाही. मात्र, वारंवार बॅंकेत जाऊन जुन्या नोटा जमा करणाऱ्यांबाबत प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात.
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

नोटाबंदीचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत मोठी सुधारणा झालेली आहे. रिझर्व्ह बॅंकेकडे मागणी पूर्ण करण्याएवढा पुरेसा चलनसाठा उपलब्ध आहे.
- शक्तिकांत दास, सचिव, आर्थिक कामकाज विभाग

Web Title: rbi has enough cash