हॉस्पिटलच्या चुकीमुळे बाळाचा हात पडला काळा आणि... 

injection
injection
Updated on

भोपाळ:  मध्य प्रदेशमध्ये एक गंभीर घटना घडली आहे. इथं विदिशातील एका नवजात बाळाला इंजेक्शन दिल्यावर त्याला ताप आला. त्यानंतर काही दिवसांनी बाळाच्या कुटुंबियांना बाळाचा हात काळा झाल्याचे दिसले. याबद्दल असं म्हटलं जात आहे की, बाळाला एक्सपायर झालेले इंजेक्शन देण्यात आले ज्याने त्याच्या शरीरीत विष पसरल्याने त्याचे हात काळे झाले आहेत. या बाळाचा जन्म 24 ऑगस्ट रोजी विदिशाच्या जिल्हा रुग्णालयात झाला. जन्मानंतर मुलाला उपचारादरम्यान हाताला इंजेक्शन दिल्यानंतर त्याचे हाच काळे होण्यास सुरवात झाली. रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी बाळाला लगेच एनआयसीयूमध्ये दाखल केले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
या संदर्भात ग्यारसपूरच्या लोहार्रा गावात राहणारे मनोज सेन यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नी मिथिलेश यांनी 24 ऑगस्ट रोजी एका निरोगी मुलाला जन्म दिला होता. बाळाला इंजेक्शन दिल्यानंतर ताप आल्याने त्याला एनआयसीयू (Neonatal intensive care unit) वॉर्डमध्ये दाखल केलं. कुटुंबीयांकडून वारंवार चौकशी करूनही त्याने त्यांना या मुलास दाखवले नाही. 5-7 दिवसानंतर, जेव्हा कुटूंबाने पुन्हा दबाव आणला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की मुलाला भोपाळच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये नेलं आहे.

त्यानंतर हे कुटुंब भोपाळला पोहोचले तेव्हा मुलाला आयसीयूमध्ये दाखल केल्याची माहिती मिळाली.  जेव्हा कुटुंबाने मुलाचा उजवा हात पाहिले तेव्हा तो काळा झाला. त्याच्या हातात एक गंभीर संक्रमण आहे आणि आता या हाताचे ऑपरेशन केलं जाईल, असं डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितलं. असे सांगितले जात आहे की मुलाला एक्सपायर झालेले इंजेक्शन दिल्याने मुलाच्या हातात विष पसरले होते.  डॉक्टर याबाबत अधिकृतपणे काहीही बोलण्यास तयार होत नाहियेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com