esakal | फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना व्हिडिओ रुपात वाहिली आदरांजली...
sakal

बोलून बातमी शोधा

sam manekshaw

भारतीय सैन्याचे नाव घेताच सर्वांना प्रकर्षाने आठवण येते ती फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची. आपल्या असामान्य कर्तृत्वाने आणि दैदीप्यमान कामगिरीने भारताची मान त्यांनी अभिमानाने उंचावली.. त्यांच्याच जीवनावर 'सॅम माणेकशॉ' हा चित्रपट बनविण्यात येत आहे.

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना व्हिडिओ रुपात वाहिली आदरांजली...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : भारतीय सैन्याचे नाव घेताच सर्वांना प्रकर्षाने आठवण येते ती फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची. आपल्या असामान्य कर्तृत्वाने आणि दैदीप्यमान कामगिरीने भारताची मान त्यांनी अभिमानाने उंचावली.. त्यांच्याच जीवनावर 'सॅम माणेकशॉ' हा चित्रपट बनविण्यात येत आहे. त्यांची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारत आहे. आज सॅम माणेकशॉ यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे आज त्यांना आरएसव्हीपी मुव्हिज यांनी एका व्हिडीओद्वारे आदरांजली वाहिली आहे.

मुंबई, पुण्यातील गर्दी नियंत्रणासाठी गडकरी यांनी सुचवलाय 'हा' पर्याय!

विकी कौशलने यापूर्वी मसान, राजी, संजू, मनमर्जिया तसेच उरी...द सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे. उरी... द्वारे विकीने समस्त भारतीयांच्या हृदयात आपले स्थान कोरले आहे. विकीने सोशल मीडियावर सॅम यांना श्रद्धांजली दिली आहे. मागील वर्षी याच दिवशी विकीने या फिल्मचा पहिलावहिला लूक शेअर केला होता. आज त्याने सॅम यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

निर्णयाचा फेरविचार करा; उच्च न्यायालयाचा मिठीबाई महाविद्यालयाला आदेश...

या व्हिडीओमध्ये प्रथम सॅम माणेकशॉ यांचा फोटो आहे, तर त्यानंतर विकी कौशल सॅम यांच्या पेहरावात दिसून येत आहे .सॅम माणेकशॉ यांची बायोपिक मेघना गुलजार दिग्दर्शित करीत आहे. मेघना यांच्या मागील कलाकृती बघता त्या या फिल्मला नक्कीच एका वेगळ्या उंचीवर नेतील हे नक्की.  

आपुलकीचे उत्तम उदाहरण..! पाणीपुरी विक्रेत्याच्या कुटुंबियांसाठी मुंबईसह जगभरातून सरसावले मदतीचे शेकडो हात...

सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकखेरीज विकीच्या आगामी सरदार उधमसिंह यांच्या बायोपिकचेही काम चालू आहे . सध्या त्याचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु आहे. आगामी वर्षात हे चित्रपट येतील, असे सूत्रांकडून समजते.