esakal | देशात लसीकरणाचा विक्रम; एकाच दिवशी 85 लाख जणांना लस
sakal

बोलून बातमी शोधा

covid vaccination

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशातील लसीकरणाचा वेग वाढविला आहे. देशात नवे लसीकरण नियम लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 85 लाखांपेक्षाही अधिक लोकांनी लस घेत नवा विक्रम प्रस्थापित केला.

देशात लसीकरणाचा विक्रम; एकाच दिवशी 85 लाख जणांना लस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशातील लसीकरणाचा वेग वाढविला आहे. देशात नवे लसीकरण नियम लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 85 लाखांपेक्षाही अधिक लोकांनी लस घेत नवा विक्रम प्रस्थापित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याचे कौतुक करताना ‘वेल डन इंडिया’ अशा भावना ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत. ‘‘ कोरोनाविरोधातील लढाईमध्ये लसीकरण हेच सर्वांत प्रभावी शस्त्र असून लस घेणाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत. सर्व नागरिकांना लस मिळावी म्हणून फ्रंटलाईन वर्कर खूप मेहनत घेत आहेत.’’ अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या. केंद्र सरकारने अठरा वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करायला सुरुवात केल्याने या मोहिमेची व्याप्ती आणखी वाढली आहे. सोमवारी एकाच दिवशी 85,15,765 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. (Record of vaccination in the country Vaccinate 85 lakh people in a single day)

केंद्र सरकारने जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी येथे दिली. शहा यांनी येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय भवनातील लसीकरण केंद्रांना भेट दिली. गुजरातचे मुख्यमंत्री नितीन पटेलही यावेळी त्यांच्यासोबत होते. या भेटीनंतर शहा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील नागरिकांचे विनामूल्य लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली या लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाविरुद्धच्या लढ्याचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. प्रत्येकाचे लसीकरण करून आम्ही हे ध्येय लवकर साध्य करू.

हेही वाचा: मुंबईकरांनो सावधान! शहरात आढळला डेल्टा प्लस व्हेरियंट

केंद्र सरकारने जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात विनामूल्य लसीकरणाचा निर्णय ही मोठी बाब आहे, असेही त्यांनी सांगितले. शहा यांनी विनामूल्य लसीकरणाच्या या निर्णयाबद्दल मोदी यांचे कौतुकही केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून देशभरात सोमवारपासून विनामूल्य लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली.

हेही वाचा: पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक उभारा

डिसेंबरअखेर २.५७ अब्ज डोस : नड्डा

नागरिकांना कोरोना लशीचा दुसरा डोस देण्यासाठी डिसेंबरअखेर देशाकडे लशीचे २.५७ अब्ज डोस असतील, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिली. भारतात लसीकरणाची जगातील सर्वांत मोठी व वेगवान मोहिम सुरू झाली आहे. लशीवरून विरोधक दिशाभूल करत असतानाही पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत १३० कोटी भारतीय लस घेण्यासाठी पुढे आले, असेही ते म्हणाले. काही नेत्यांनी लस घेण्यासाठी आपण डुक्कर किंवा उंदीर नसल्याचे सांगितले. मात्र, लशीबद्दल शंका असणारे हे नेतेच आता लस घेत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

loading image