esakal | मुंबईकरांनो सावधान! शहरात आढळला कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट
sakal

बोलून बातमी शोधा

Delta Variant

मुंबईकरांनो सावधान! शहरात आढळला डेल्टा प्लस व्हेरियंट

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबईतही कोरोनाचा डेल्टा प्लस हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. मुंबईहून पाठवलेल्या नमुन्यांपैकी दोन नमुन्यांमध्ये हा व्हेरियंट आढळून आला आहे. याआधी रत्नागिरीत ९, जळगावमध्ये ७, पालघरमध्ये १, सिंधुदुर्गमध्ये १ आणि ठाण्यातील एका नमुन्यात डेल्टा प्लसचा व्हेरियंट आढळल्याची माहिती सोमवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Mumbaikar beware Delta Plus variant of Corona found in the city)

हेही वाचा: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा पुन्हा फोन; पुण्यातून एकाला अटक!

अद्याप पालिकेला याबाबतचा अहवाल मिळाला नसल्याने त्यांना आणखी थोडा वेळ लागेल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. जीनोम सिक्वेंसिंगसाठी राज्यातून एकूण ७,५०० नमुने पाठवण्यात आले होते, त्यांपैकी २१ नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळला आहे.

हेही वाचा: EDची मोठी कारवाई; अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त

याबाबत अधिक माहिती देताना टोपे म्हणाले, "महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० नमुने घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली. या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी CSIR आणि IGIB या महत्त्वाच्या संस्थेची मदत यासाठी घेण्यात आली आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७,५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे सिक्वेंन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ प्रकरणं आढळून आली आहेत.

हेही वाचा: घ्या! अर्ध्या तासात नागरिकास दिले लसीचे दोन डोस

या प्रकरणांबाबत आता इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का? त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का? याबाबत माहिती घेऊन त्यांच्या सहवासातील लोकांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे, त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे.

loading image