esakal | Corona Updates: दिलासादायक! देशात 60 लाखांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

recovery from corona.

जगभरासह भारतात कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे.

Corona Updates: दिलासादायक! देशात 60 लाखांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: जगभरासह भारतात कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. तसेच देशातील कोरोनातून बरे झालेल्यांचा आकडा 60 लाखांच्या वर गेला आहे. सध्या देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यात दिसून येत आहे. तसेच येथे कोरोनाच्या रुग्णांची बरे होण्याचा टक्काही जास्त आहे. या राज्यात देशातील कोरोना रुग्णांपैकी 61 टक्के रुग्ण असून देशाच्या 54.3 टक्के रुग्ण या राज्यांतून बरे झाले आहेत. 

महाराष्ट्रात सध्या 12 लाख 29 हजार 339 रुग्ण रिकव्हर झाले असून 2 लाख 36 हजार 947 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातही सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे.

हेही वाचा- Hathras Case : हाथरस प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीबीआयकडे

देशातील कोरोना रुग्णाचा आकडा 70 लाखांच्या वर गेला आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 74 हजरा 383 नवीन रुग्ण आढळले असून 918 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस देशातील कोरोनाचे सक्रिय रुग्ण कमी होताना दिसत आहेत. सध्या देशात 8 लाख 67 हजार 496 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशात 70 लाख 53 हजार 807 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत देशात 1 लाख 8 हजार 334 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

शनिवारी एका दिवसात देशात कोरोनाच्या 10 लाख 78 हजार 544 चाचण्या झाल्या आहेत. तर 10 ऑक्टोबरपर्यंत देशात कोरोनाच्या 8 कोटी 68 लाख 77 हजार 242 चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

हेही वाचा- भारत होतोय शस्त्रसज्ज! चिनी ड्रोनचा सामना करणार रुस्तम-२ आणि इस्त्राईली हेरॉन

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती- 
मागील 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाच्या 308 रुग्णांचा मृत्यू झाला असून नवीन 11 हजार 416 रुग्णांचे निदान झाले आहे. शनिवारी एका दिवसात राज्यातील 26 हजार 440 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे.

राज्यात आतापर्यंत 15 लाख 17 हजार 434 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर दिलासादायक बाब म्हणजे त्यातील 12 लाख 29 हजार 339 रुग्ण बरे झाले असून 2 लाख 36 हजार 947 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात आतापर्यंत 40 हजार 40 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती राज्यातील आरोग्य विभागाने ( State Health Department) दिली आहे.

(edited by- pramod sarawale)