Hathras Case : हाथरस प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीबीआयकडे 

hathras case cbi takes investigation charge from up police
hathras case cbi takes investigation charge from up police

नवी दिल्ली : देशभरात गाजत असलेल्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी आता उत्तर प्रदेश पोलिसांकडून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे देण्यात आली आहे. आज, रात्री सीबीआयने उत्तर प्रदेश पोलिसांकडून तपासाची सूत्रे हाती घेतल्याची माहिती आहे. 

हाथरस प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून घेण्यास केलेला उशीर, पीडित तरुणीच्या कुटुंबावर टाकण्यात आलेला दबाव, कुटुंबाला भेटण्यापासून मीडियाला रोखणे, अशा अनेक प्रकारांमुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या भूमिकेकडे बोट केले जात होते. पीडित तरुणीचे पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्यामुळे देशभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. केंद्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने प्रकरण आणखी तापले होते. देशभरातून टीका झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. 

पीडितेच्या घरी संशयास्पद महिला 
हाथरस प्रकरणात आज, आणखी एक संशयास्पद खुलासा झाला आहे. पीडित तरुणीच्या घरी एक महिला संशयास्पदरित्या राहत होती. पीडित तरुणीची वहिनी बनून ही महिला राहत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संशयास्पद महिलेचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सध्याचा व्हिडिओ 6 ऑक्टोबरचा असून, सीपीआय आणि सीपीएमचे सदस्य पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते. तेव्हाचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com