भारत होतोय शस्त्रसज्ज! चिनी ड्रोनचा सामना करणार रुस्तम-२ आणि इस्त्राईली हेरॉन 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 October 2020

चीन पूर्व लडाखच्या भागात हालचाली वाढवत असल्याने भारतही सतर्क झाला आहे.

नवी दिल्ली- चीन पूर्व लडाखच्या भागात हालचाली वाढवत असल्याने भारतही सतर्क झाला आहे. चीनचे ड्रोन्स आणि फायटर जेस्ट अनेकदा सीमेजवळ फिरताना दिसले आहेत. भारतही आपल्या परीने सर्व तयारी करत आहे. सर्विलंससाठी ड्रोन्सचा वापर केला जात आहे, तसेच यात सुधारणा करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनाईझेशन DRDO अत्याधुनिक ड्रोन तयार करत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रुस्तम-२ ड्रोनचे यशस्वी उड्डाण पार पडले. याशिवाय इस्त्राईलकडून मिळालेल्या हेरान ड्रोन्सना मिसाईल आणि लेजर गाईडेड बॉम्बने लेस करण्याची तयारी करण्यात येत आहे. पीएलएला आपल्या ड्रोन्सवर मोठा गर्व आहे. ड्रॅगेनचा गर्व उद्धवस्त करण्यासाठी भारत आता सक्षम होत आहे.

पीएम मोदी’ पुन्हा होणार रिलीज;अनलॉकच्या 5 व्या टप्प्यात चित्रपटगृहे होणार सुरु ?

र्नाटकच्या चित्रदुर्गामध्ये रुस्तमची चाचणी करण्यात आली. रुस्तम ड्रोन १६ हजार फुट उंचीवर सलग ८ तास उडत राहिला. याशिवाय त्याच्यामध्ये आणखी एक तास उडण्याचे इंधन शिल्लक राहिले होते. २०२१ सुरुवातीपर्यंत हा प्रोटोटाईप २६,००० फुट उंचीवर उड्डाण करण्याची क्षमता मिळवण्याची आशा आहे. शिवाय याचा उड्डाण वेळ १८ तास करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. रुस्तम-२ आवश्यकतेनुसार वेगवेगळे पेलोड्स घेऊन जाऊ शकतो. या ड्रोनसोबत सिंथेटिक अपर्चर रडार, इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस सिस्टम आणि सिचुएशनल अवेयरनेस सिस्टिम पाठवले जाऊ शकते. यामध्ये एक सॅटेलाईट कम्युनिकेशन लिंक सुद्धा आहे, जे युद्ध स्थितीची माहिती तात्काळ देते. 

डीआरडीओचा उद्देश रुस्तम-२ ला इस्त्राईली हेरॉनच्या तोडीचे ड्रोन बनवण्याचा आहे. हेरॉन ड्रोनला हवाईदल आणि नौदल पूर्वीपासून उपयोगात आणत आहे. चीनसोबत तणाव वाढत असल्याने रुस्तम-२ च्या अत्याधुनिकीकरणाला वेग आला आहे. असे असले तरी लष्करात सामील करण्याआधी ड्रोनला कठीण परिक्षण आणि चाचण्यांमधून जावे लागेल. 

रशियाच्या मध्यस्थीला यश; अर्मेनिया-अझरबैजान यांच्यात युद्धविराम

भारत सरकार इस्त्राईली ड्रोनला पूर्ण अपग्रेड करणार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून मंजूरी मिळाली आहे. हेरॉनवर हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईल आणि लेजर गायडेट बॉम्ब लावण्यात येणार आहेत. याशिवात सॅलेटाईट लिंकही लावली जाणार आहे, जेणेकरुन रिअल टाईममध्ये सर्व माहिती मिळू शकणार आहे. दरम्यान, गेल्या ५ महिन्यांपासून भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. उभय देशांनी सीमा भागात जवानांची तैनाती केली आहे. तसेच दोन्ही देश शस्त्र सज्जता करत आहेत.

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DRDO Rustom drone takes-off today India goes for armed Heron