बँक क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; सात हजारांहून अधिक पदांची होणार भरती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

विविध बँकांमध्ये भरतीसाठी अर्ज 18 जूनपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2019 ला निश्चित केली गेली आहे.

नवी दिल्ली : बँकिंग पर्सनल सिलेक्शन संस्थान (आयबीपीएस) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेमध्ये व्यवस्थापक व ऑफिस सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे. एकूण 7401 पदांवर भरती होणार आहे. पदसंख्येत काहीवेळा बदल केला जाऊ शकतो. 18 जूनपासून या पदांसाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना मुख्य परीक्षेत भाग घेता येईल आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

आयबीपीएस आरआरबी परीक्षे संबंधित अधिक माहिती खालीलप्रमाणे :-

पदाचे नाव :
अधिकारी (स्केल I, II व III) आणि कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय)

महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 18 जून 2019
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 4 जुलै 2019
अर्जाचे शुल्क भरण्याची शेवटची तारीख - 4 जुलै 2019

क्षमता :
अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील स्नातक, बी.ई./बी.टेक, एल.एल.बी, सी.ए, एम.बी.ए. पदवी. पात्रतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहा.

वय :
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा निश्चित केल्या आहेत. किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचना पाहा.

या आधारावर होणार निवड :
उमेदवारांची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.

अर्जासाठीचे शुल्क :
खुला, ओबीसी, ईडब्ल्यूएस - 600 रुपये
एससी, एसटी, पीडब्ल्यूडी - 100 रुपये

आयबीपीएस आरआरबीसाठी अर्ज :
इच्छुकांनी ऑनलाइन आयबीपीएसच्या http://www.ibps.in या संकेतस्थळास भेट द्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recruitment for banking jobs in IBPS RRB