Recruitment for one lakh posts in Indian Railway
Recruitment for one lakh posts in Indian Railway

भारतीय रेल्वेत एक लाख पदांसाठी नोकर भरती

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे मध्ये वर्ग (ड) पदाच्या एक लाख पदांसाठी नोकर भरती होणार आहे. उद्या मंगळवार (ता.12 मार्च) रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून अर्ज स्विकारण्यास सुरवात हाईल. रेल्वे विभागाने भरती विषयीची अधिसुचना जाहीर केली आहे. रेल्वे भर्ती मंडळ (Railway Recruitment Board-RRB) च्या वेबसाईटवर ही संपुर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वेबसाईटवर जाऊन आपआपल्या विभागानुसार अर्ज भरता येणार आहेत. यासंबंधी 23 फ्रेब्रुवारीच्या नोकरी संदर्भ वृत्तपत्रात भरती विषयी अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार विविध तांत्रिक विभाग (इलेक्ट्रिकल, इंजिनियरिंग, मैकेनिकल व एसएंडटी विभाग) आदी मध्ये हेल्पर, सहाय्यक, पॉइन्टमन अशा पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहे.

मागील वर्षी RRB ने 62 हजार 907 पदांसाठी नोकर भरती घेतली होती. त्याचा निवकाल 4 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला. त्यानंतरची ही मोठी भरती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com