बँकींग क्षेत्रात 8400 पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

आयबीपीएस मार्फत बँकींग क्षेत्रातील पदभरती संदर्भात कोणत्या पदांसाठी नेमक्या किती जागा आहेत आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किती असेल याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. 

आयबीपीएस मार्फत बँकींग क्षेत्रातील 8400 पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2019 ही आहे. या पदभरती संदर्भात कोणत्या पदांसाठी नेमक्या किती जागा आहेत आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किती असेल याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. 

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) - 3688
ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) - 3381
ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) - 106
ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) - 45
ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) - 11
ऑफिसर स्केल-II (लॉ) - 19
ऑफिसर स्केल-II (CA) - 24
ऑफिसर स्केल-II (IT) - 76
ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) - 893
ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) - 157
एकूण - 8400 पदे

शैक्षणिक पात्रता : 
पद क्र. 1: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र. 2: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र. 3: 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष आणि 2 वर्षे अनुभव
पद क्र. 4: एमबीए (विपनन) आणि 1 वर्ष अनुभव
पद क्र. 5: सीए/एमबीए (वित्त) आणि 1 वर्ष अनुभव
पद क्र. 6: 50% गुणांसह विधी पदवी (एलएलबी) आणि 2 वर्षे अनुभव
पद क्र. 7: सी. ए. आणि 1 वर्ष अनुभव
पद क्र. 8: 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /आयटी पदवी आणि 1 वर्ष अनुभव
पद क्र. 9: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि 2 वर्षे अनुभव
पद क्र. 10: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि 5 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 1/6/2019 पर्यंत...
पद क्र. 1 : 18 ते 28 वर्षे
पद क्र. 2 : 18 ते 30 वर्षे
पद क्र. 3 ते 9 : 21 ते 32 वर्षे
पद क्र. 10 : 21 ते 40 वर्षे
(मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे तर इतर मागासवर्गींयासाठी 3 वर्षे सूट)

तसेच, अधिक माहितीसाठी आयबीपीएसने जारी केलेले पत्रक वाचण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 
https://bit.ly/31Cixro


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recruitment of over eight thousand posts in banking sector by IBPS