नीरव मोदी विरुद्ध रेड कॉर्नर नोटिस

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जुलै 2018

नवी दिल्ली - केंद्रिय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अहवालानुसार पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदी विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटिस बजावली आहे. या नोटिसमध्ये सदस्य देशांना नीरव मोदीला अटक करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.  नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसीविरोधात विविध तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. 

हे दोघेही परंदशात पळून गेल्यानंतर सीबीआय आणि ईडीने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केले होते. नीरव मोदीविरोधात हवाला प्रकरणात सुनावणी करत असलेल्या विशेष न्यायालयाने ईडीला कारवाईची परवानगी दिली आहे.

नीरव मोदी वारंवार वास्तव्याची ठिकाणे बदलतो. त्याच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटच्या आधारे न्यायालयाने त्याच्याविद्ध अजामिनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

Web Title: Red Corner Notice against Neerav Modi