दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरातून तब्बल १ कोटी रुपयांचा सोने आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेला कलश चोरीला (Delhi Red Fort Theft) गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार मंगळवारी घडला..मिळालेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक १५ जवळील पार्कमध्ये जैन समुदायाचा धार्मिक विधी सुरू होता. याचदरम्यान चोरांनी संधी साधून ७६० ग्रॅम सोने, १५० ग्रॅम हिरे, माणिक आणि पाचू जडवलेला कलश चोरून नेला..Satara Ganpati Visarjan Video : भगवान शंकराची कृपा? मामाच्या डोक्यावर सुरक्षित नाचतो गणपती! पाहा अद्भुत क्षण.पोलिसांची धावपळघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी स्पष्ट केले की, लाल किल्ल्याच्या आत ही चोरी घडलेली नसून किल्ल्याच्या उद्यानातून हा कलश चोरीला गेला आहे..सीसीटीव्हीत संशयित कैदया घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयिताच्या हालचाली त्यात कैद झाल्या आहेत. संशयिताची ओळख पटवण्यात आली असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता (BNS) २०२३, कलम ३०३ (२) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चोरी गेलेला कलश सध्या पोलिसांसाठी शोधाचे मोठे आव्हान ठरला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.