‘भारत जोडो’ यात्रेत भाजपशासित राज्यात इंधन भरा, पैसे वाचतील; BJPचा काँग्रेसला टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi and Hardeep Singh Puri

‘भारत जोडो’ यात्रेत भाजपशासित राज्यात इंधन भरा, पैसे वाचतील; BJPचा काँग्रेसला टोला

नवी दिल्ली - काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर भाजपकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर खोचक टीका केली आहे. पुरी यांनी काँग्रेस नेत्यांना भाजपशासित राज्यांत वाहनांमध्ये इंधन भरण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून पैसे वाचू शकतील. (Bharat Jodo news in Marathi)

हेही वाचा: Rahul Gandhi भेटले कोट्यवधी सबस्क्राइबर्स असलेल्या युट्यूब चॅनलच्या सदस्यांना

पुरी म्हणाले की, यात्रेदरम्यान, 12 राज्यांमधून 3,500 किलोमीटरचा प्रवास काँग्रेसनेते करणार आहे. भाजपशासित राज्यांमधून पेट्रोल भरल्यास काँग्रेस नेते डिझेल वाहनांवर प्रतिवाहन 1,050-2,205 रुपये वाचवू शकतात.

आपल्या ट्विटमध्ये केंद्रीयमंत्री म्हणाले, "काँग्रेससाठी एक सल्ला आहे, ज्या राज्यांनी इंधनाच्या किंमती कमी करण्याकडे दुर्लक्ष केलं अशा राज्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाजपशासित राज्यांमध्ये इंधन भरून घ्या.

हेही वाचा: भारताचा सर्वात मोठा पप्पू, अमित शहा; तृणमूल काँग्रेसची भाजपविरुद्ध मोहीम

पुरी पुढं म्हणाले की, दिल्लीऐवजी हरियाणामध्ये इंधन भरून रुपये 3.07/लिटर, राजस्थानऐवजी यूपीमध्ये इंधन भरून 3.96/लिटर रुपये, तेलंगणाऐवजी महाराष्ट्रात इंधन भरून 3.55 रुपये/लिटर तसेच तामिळनाडू आणि केरळऐवजी कर्नाटकमध्ये इंधन भरून अनुक्रमे 6.35 रुपये/लिटर आणि रुपये 8.63/लिटर वाचवू शकता.

दरम्यान 12 राज्यांमध्ये, 3,500 किमी आणि 150 दिवसांच्या प्रवासात, काँग्रेस प्रति डिझेल वाहन 1,050 ते 2,205 रुपयांच्या दरम्यान बचत करू शकता. या सल्ल्याबद्दल काँग्रेस माझे आभार मानू शकते, असही केंद्रीय मंत्री पुरी यांनी म्हटलं.

Web Title: Refuel Vehicles In Bjp Ruled States During Bharat Jodo Yatra To Save Money Puri Tells Congress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..