
Delhi New CM Rekha Gupta: भाजपच्या रेखा गुप्ता आज (गुरुवार) रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. देशाच्या राजधानीत २७ वर्षांनंतर भाजपचा उमेदवार मुख्यमंत्री बनणार आहे. बुधवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाने रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड केली. त्या सध्या देशातील दुसऱ्या तर भाजपच्या एकमेव महिला मुख्यमंत्री असणार आहेत.