
Prisoner Steals Jail Chequebook After Release Spends Money on Wedding and Bullet
Esakal
वाराणसीत आजमगढ जिल्हा तुरुंगात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलाय. पत्नीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला. यानंतर जेव्हा आरोपी तुरुंगातून बाहेर जात होता त्यावेळी त्यानं तुरुंग प्रशासनाचं चेकबूक चोरी केलं. बाहेर गेल्यानंतर त्यानं तुरुंग प्रशासनाच्या खात्यावर असलेले ३० लाख रुपये आपल्या खात्यावर ट्रान्सफर केले. तुरुंग प्रशासनाच्या खात्यावरून चोरलेल्या रकमेतून रामजितने त्याच्या बहिणीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिलं. यानंतर त्यानं एक बुलेटही खरेदी केलीय.