esakal | कोरोनाकाळात मुकेश अंबानी धावले मदतीला, दिवसाला 700 टन ऑक्सिजन पुरवणार

बोलून बातमी शोधा

कोरोनाकाळात मुकेश अंबानी धावले मदतीला, दिवसाला 700 टन ऑक्सिजन पुरवणार
कोरोनाकाळात मुकेश अंबानी धावले मदतीला, दिवसाला 700 टन ऑक्सिजन पुरवणार
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असतानाही दिसत आहे. अशा परिस्थितीत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 700 टनांहून अधिक मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करत आहे. हा ऑक्सिजन कोरोनाच्या संकटात सापडलेल्या राज्यांना मोफत दिला जाणार आहे. कंपनीच्या जामनगर रिफायनरीमध्ये सुरुवातील 100 टन मेडिकल ऑक्सिजन तायर केला होता. तो वाढवून आता 700 टन करण्यात आला आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यामुळे कोरोनाबाधित असलेल्या 70 हजारांहून अधिक रुग्णांना दिलासा मिळणार आहे. त्यांनी सांगितलं की, लवकरच मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून ते 1 हजार टन करण्याची योजना आहे.

जामनगर रिफायनरीमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती होत नाही. या रिफायनरीमध्ये कच्च्या तेलाला डिझेल, पेट्रोल आणि विमान इंधनात बदललं जातं. मात्र कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होत आहे. अशा परिस्तितीत रिलायन्सने मेडिकल ऑक्सिजन तयार करण्यासाठी आवश्यक यंत्रणा लावली आहे. मेडिकल ऑक्सिजन तयार करण्यासाठी औद्योगिक ऑक्सिजन तयार कऱण्यासाठी वापरण्यात येणारी साधने वापरली जात आहेत.

हेही वाचा: नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 11 रुग्णांचा मृत्यू; राजेश टोपे यांची धक्कादायक माहिती

दर दिवशी जवळपास 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा विविध राज्यांना केला जात आहे. यामुळे जवळपास 70 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना मदत होत आहे. ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी शून्यापेक्षा कमी उणे 183 अंश सेल्सियस तापमान असलेले विशेष टँकर वापरले जात आहेत. कोणत्याही खर्चाशिवाय राज्य सरकारला पूर्णपणे मोफत हा ऑक्सिजन दिला जात आहे. कंपनीच्या सीएसआरमधील एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील आयओसी आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने सुद्धा त्यांच्या रिफायनरीमध्ये मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन सुरु केले आहेत. त्याचे वितरण प्रभावित अशा राज्यांमध्ये केलं जात आहे. याशिवाय टाटा स्टीलने सुद्धा त्यांच्या पातळीवर ऑक्सिजनचं उत्पादन सुरु केलं असून राज्यांना पुरवठा केला जात आहे.