पंतप्रधान मोदींच्या धाडसी सुधारणांमुळे देश प्रगती करेल; मुकेश अंबानींकडून कौतुक

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 21 November 2020

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शनिवारी (21 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी  ( Prime Minister Narendra Modi) यांचे तोंडभरुन कौतुक केले

गांधीनगर- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शनिवारी (21 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी  ( Prime Minister Narendra Modi) यांचे तोंडभरुन कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात करण्यात येत असलेल्या धाडसी सुधारणा येणाऱ्या वर्षांमध्ये भारताच्या तीव्र आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतील, असं ते म्हणाले आहेत. मुकेश अंबानी पंडित दीनदयाल पेट्रोलियम विश्वविद्यालयाच्या (Pandit Deendayal Petroleum University- PDPU) दीक्षांत समारोहाला व्हर्चुअल पद्धतीने संबोधित करत होते. 

पंतप्रधान मोदी यांच्या दृढ आणि प्रभावशाली नेतृत्वामुळे संपूर्ण जगात भारताला मानाचे स्थाळ मिळत आहे. त्यांचा आत्मविश्वास आणि दृढ विश्वासाने सर्व देशाला पुढे जाण्यासाठी प्रेरित केले आहे. मला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वात करण्यात येत असलेल्या धाडसी सुधारणा येणाऱ्या काळात भारताची आर्थिक भरपाई करतील. एवढेच नव्हे तर भारत आर्थिक प्रगतीत अग्रेसर राहिल, असं मुकेश अंबानी म्हणाले आहेत. 

भाजप नेत्यांच्या घरात झालेली आंतरधर्मीय लग्नं 'लव्ह जिहाद' आहेत का?

मुकेश अंबानी यांनी नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हाच्या एका गोष्टीचाही उल्लेख केला. पीडीपीयू हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर' दृष्टीचेच एक पोडक्ट आहे. ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी याचे व्हिजन दिले होते, असं ते म्हणाले. पुढे अंबानी म्हणाले की, ''पीडीपीयू केवळ 14 वर्ष जूने आहे. पण, अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्सच्या टॉप-25 च्या यादीत याचा समावेश आहे.''

देशाच्या वाढत्या उर्जा आवश्यकतांवरही मुकेश अंबानी यांनी भाष्य केलं. उर्जा क्षेत्राचे भविष्य अभूतपूर्व बदलातून जात असून यामुळे मानवतेचे भविष्य प्रभावित होणार आहे. आपल्यासमोर महत्वाचा प्रश्न हा आहे की, पर्यावरणाला नुकसान न पोहचवता आपण आपली अर्थव्यवस्था कशी वाढवू शकतो? आपल्याला जलवायू पर्यावरणाला नुकसान न पोहोचवता आपली गरज पूर्ण करायची आहे, असंही ते म्हणाले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Mukesh Ambani praises prime minister narendra modi