Religious Conversion : हॉटेलमध्ये 500 जणांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न; 'असा' उघडकीस आला प्रकार

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यामध्ये रविवारी एक धर्मांतराचा प्रकार समोर आलेला आहे. एका हॉटेलमध्ये तब्बल ५०० लोकांचं एकत्रित धर्म परिवर्तन केलं जात होतं. या प्रकाराची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि धर्मांतराची प्रक्रिया थांबवली.
Religious Conversion
Religious Conversion esakal

भरतपूरः राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यामध्ये रविवारी एक धर्मांतराचा प्रकार समोर आलेला आहे. एका हॉटेलमध्ये तब्बल ५०० लोकांचं एकत्रित धर्म परिवर्तन केलं जात होतं. या प्रकाराची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि धर्मांतराची प्रक्रिया थांबवली.

यावेळी विश्व हिंदू परिषद आणि धर्मांतर करणाऱ्या आयोजकांमध्ये जोरदार गोंधळ झाला. त्यामुळे हॉटेलमध्ये जमलेले लोकसुद्धा पळून गेले. त्यांनंतर पोलिांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Religious Conversion
Ranji Trophy Records : जलज सक्सेनाने रचला इतिहास; मात्र निधिशच्या एका विकेटने स्वप्न राहिले अधुरे

धर्मांतराचं हे प्रकरण रविवारी भरतपूर शहरातील अटल बंद ठाण्याच्या परिसरात घडलं. एका हॉटेलमध्ये हे परिवर्तन केलं जात होतं. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, ख्रिश्चन धर्माच्या लोकांकडून सत्संगाच्या माध्यमातून धर्मांतर केलं जाणार होतं. यामध्ये पाचशेपेक्षा जास्त महिला आणि तरुणींचा समावेश होता.

विश्व हिंदू परिषेदेचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये पोहोचताच मोठा गोंधळ उडाला. जे लोक धर्मांतर करणार होते हे हॉटेलमध्ये पळून जावू लागले. कार्यकर्त्यांनी साधारण १० जणांना पकडलं. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली. दोन्ही बाजूंकडून मोठा गदरोळ झाला.

Religious Conversion
Hungary President Resigns: हंगेरीच्या अध्यक्षांचा राजीनामा; बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषीला दिली होती माफी

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अश्रूधुरांच्या नळकांड्या घेऊन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाचपेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शिवाय पाच ते सात महिला आणि तरुणींनाही अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल २० ठिकाणांवर असंच धर्मपरिवर्त केलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com