esakal | "गडकरींकडे कोरोना संकट हाताळण्याची जबाबदारी द्या"
sakal

बोलून बातमी शोधा

नितीन गडकरी

"गडकरींकडे कोरोना संकट हाताळण्याची जबाबदारी द्या"

sakal_logo
By
नामदेव कुंभार

कोरोना विषाणूच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक परिस्थिती अतिशय भयावह होत चालली आहे. आरोग्य व्यवस्थेच्या बोजवारामुळे अनेकांचे बळी जातायेत. लोकांमध्ये चिंतेचे वातारण आहे. यातच अनेक तज्ज्ञांच्या मते तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता असून देशातील परिस्थिती आणखी चिघळू शकते. या परिस्थितीतून बाहे येण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी मोदींना महत्वाची सुचना केल आहे. देशावर आलेलं कोरोना संकट हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांच्या मते, 'कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते. ही लाट लहान मुलांसाठी आधिक धोकादायक आहे. अशा परिस्थितीत आताच योग्य ती पावलं उचलावी लागतील.' कोरोनाचं हे संकट हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र (PM modi )मोदी यांनी नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, असं ट्विट स्वामी यांनी केलं आहे. कोरोना संकटासाठी पीएमओवर (PMO) निर्भर राहू शकत नाही. देशात कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर होत आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्या नवीन विक्रम करत आहे. कोरोना परिस्थिती (coronavirus) हाताळण्याच्या पद्धतीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यामुळे आताच योग्य ती पावले उचलण्यात यावीत, असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय.

पाहा स्वामींचं ट्विट -

हेही वाचा: नितीन गडकरी यांचा इशारा कोणाला? गटबाजी फोफावल्याचे केले मान्य

कोरोना संकट हाताळण्याची जबाबदारी गडकरी यांच्याकडे सोपवण्यात यावी, या मागणीनंतर सोशल मीडियावर गडकरी ट्रेंड होत आहेत. नेटकऱ्यांना स्वामींच्या मागणीला दात दिली आहे. अनेंकांना स्वांमी यांनी केलेली ही मागणी योग्य असल्याचं वाटतेय.

loading image