Rajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा

वृत्तसंस्था
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

'राजीव गांधी हे दयाळू, सौम्य व प्रेमळ स्वभावाचे होते, त्यांच्या अकाली निधनामुळे माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे. मला आठवतंय ते असताना आम्ही त्यांचे अनेक जन्मदिवस एकत्र साजरे केले होते. ते आता आमच्यासोबत नसले, तरी त्यांच्या आठवणी काय आमच्यासोबत राहतील,' असे भावनिक ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.  

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी प्रियांका गांधी वद्रा व त्यांचे पती रॉबर्ट वद्रा यांनी दिल्लीतील त्यांच्या समाधीस्थळी म्हणजेच वीरभूमी येथे जाऊन अभिवादन केले. तर राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी वीरभूमी येथे जाऊन अभिवादन केले.   

'राजीव गांधी हे दयाळू, सौम्य व प्रेमळ स्वभावाचे होते, त्यांच्या अकाली निधनामुळे माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे. मला आठवतंय ते असताना आम्ही त्यांचे अनेक जन्मदिवस एकत्र साजरे केले होते. ते आता आमच्यासोबत नसले, तरी त्यांच्या आठवणी काय आमच्यासोबत राहतील,' असे भावनिक ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून गांधी यांना अभिवादन केले.

राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. देशाचे सातवे पंतप्रधानपद त्यांनी भूषविले. राजीव गांधी हे देशातील सर्वात कमी वयाचे पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. भारत सरकारने राजीव गांधी यांना 1991 रोजी सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित केले. गांधी यांनी संगणकीकरणाला प्रोत्साहन दिले व संगणकयुगाची सुरवात केली. 1991 साली राजीव गांधी यांची प्रचारसभेदरम्यान फुटीरतावादी एलटीटीई या संघटनेकडून त्यांची हत्या करण्यात आली होती.

 

Web Title: remembering rajiv gandhi on his birth anniversary