गुगल प्ले स्टोअरवरून 12 ऍप हटविण्याच्या सूचना

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या 12 अँड्राईड ऍप्लिकेशन्समुळे "आधार'ची सुरक्षा धोक्‍यात असल्याने ही ऍप्स स्टोअरवरून हटविण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. अशा प्रकारे सरकारने गुगलला सूचना देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात असून, आधारमार्फत (यूएडीएआय) सरकारने याबाबत गुगलला कळविले आहे.

2016च्या आधार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारने बेकायदा आणि फसव्या कंपन्या बंद करण्याचे ठरविले आहे. यानुसार 12 संकेतस्थळे, 12 स्मार्टफोन ऍप्स आणि अशा 26 आणखी बेकायदा आणि फसव्या संकेतस्थळांसह ऍप्लिकेशन्सही बंद करण्याचे ठरविल्याचे अहवालावरून समजते.

आधारसंदर्भातील काही सेवा या कंपन्या परवाना नसताना आणि अवाजवी किंमत लावून देत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आधार कार्ड डाउनलोड करणे आणि अन्य माहिती पुरविणे यासाठी पैसे आकारले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या खोट्या कंपन्यांच्या आणि त्यांच्या ऍपच्या मुसक्‍या आवळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

यूआयडीएआय अशा कोणत्याही ऍप किंवा संकेतस्थळाचा मालक नाही, जे आधारशी संलग्न सेवा पुरवित आहेत. काही संकेतस्थळांनी तर आधारचा लोगोही चोरून वापरल्याने लोकांची दिशाभूल होत आहे.
- डॉ. अजय भूषण पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, यूआयडीएआय

Web Title: Remove 12 app from google store; govt instructions