मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी रणनिती आखतोय : स्टॅलिन

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

द्रमुकच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर माझ्यासाठी नवा जन्म आहे, अशा शब्दांत स्टॅलिन यांनी भावना व्यक्त केल्या.

नवी दिल्ली : ''केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील अण्णा द्रमुक सरकारला आव्हान देण्यासाठी द्रमुककडून रणनिती आखली जात आहे'', असे द्रमुकचे नवनिर्वाचित अध्यक्ष स्टॅलिन यांनी आज (मंगळवार) स्पष्ट केले. 

द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर स्टॅलिन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर द्रमुकची सर्वसाधारण परिषद पार पडली. या परिषदेनंतर स्टॅलिन म्हणाले, आजची राजकीय परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे. ही राजकीय परिस्थिती शिक्षण, कला, साहित्य, धर्म सांप्रादायिक मूल्यांवर परिणामकारक ठरत आहे. मोदी सरकारवर आरोप करताना ते म्हणाले, न्यायव्यवस्था आणि राज्यपालांची निवड हे सर्व अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच पलानीस्वामी सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, चोरांच्या हातातून तामिळनाडूची सत्ता पुन्हा खेचून आणणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. 

दरम्यान, द्रमुकच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर माझ्यासाठी नवा जन्म आहे, अशा शब्दांत स्टॅलिन यांनी भावना व्यक्त केल्या.

Web Title: Remove Modi govt at centre says Stalin