Repo Rate : रेपो रेट म्हणजे काय? त्याचा आपल्या गृहकर्जावर कसा परिणाम होतो जाणून घ्या

रेपो रेट कोण वाढवतं आणि त्याचा फायदा नक्की कोणाला होतो
Repo Rate
Repo RateEsakal

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपलं पतधोरण जाहीर केलं असून त्यानुसार रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. हा रेपो रेट ०.२५ बेसिस पॉईंटनं वाढवण्यात आला आहे. त्यामुळे गृहकर्ज महागणार आहेत. रेपो रेट वाढला किंवा कमी झाला तर त्याचा आपल्या आपण घेतलेल्या कर्जावर कसा थेट परिणाम होतो याबद्दल अनेकांना माहिती नाही.

आरबीआयच्या क्रेडिट पॉलिसी दरम्यान रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआर अशा स्वरुपाचे शब्द आपण आवश्य ऐकला असाल. पण, रेपो रेट वाढल्याने गृहकर्ज कसे महाग झाले. रेपो रेट कोण वाढवतं आणि त्याचा फायदा नक्की कोणाला होतो, याबद्दल जाणून घेऊयात

Repo Rate
RBI monetary policy: रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर; आर्थिक वाढ, महागाई, GDP किती राहील जाणून घ्या

रेपो रेट म्हणजे काय?

दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात.

रिझर्व्ह बँकेकडून ज्या व्याजदराने कर्ज मिळत असेल त्यावर देशभरातल्या बँका आपल्या ग्राहकांचा व्याजदर ठरवतात. जर, रेपो रेट वाढला तर जास्त व्याजदर आणि रेपो रेट कमी झाला तर व्याजदर कमी असे सुत्र आहे.

Repo Rate
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट वाढवला; गृहकर्ज, वाहन कर्ज महागणार

रिव्हर्स रेपो रेट

बरेचदा दिवसभर व्यवहार करूनही बँकांकडे मोठी रक्कम शिल्लक राहते. ही रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. 

Repo Rate
RBIने repo rate वाढवल्यास तुमचा EMI किती वाढणार ?

नावावरूनच रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट एकमेकांच्या विरुद्धार्थी असल्याचे स्पष्ट होते. रिव्हर्स रेपो रेटचा अर्थ विविध बँकांचा आरबीआयमध्ये जमा असलेल्या पैश्यावर बँकांना मिळणारा व्याज होय. रिव्हर्स रेपो रेटच्या माध्यमातून आरबीआय बाजारपेठातील कॅश लिक्विडी अर्थात कॅशच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकते. 

Repo Rate
RBI Repo Rate : होमलोनसह सर्व कर्जे महागणार; RBI कडून रेपो दरात वाढीची घोषणा

देशात लागू असलेल्या बँकिंग नियमांनुसार, प्रत्येक बँकेला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या एकूण रकमेपैकी ठराविक रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागते. यालाच कॅश रिझर्व्ह रेशो असे म्हटले जाते. त्यावरूनच ठराविक रक्कम निश्चित केली जात असते.

Repo Rate
RBI Repo Rate : रेपो दरवाढीची शक्यता

एसएलआर 

एसएलआरचे पूर्ण नाव स्टॅट्युटरी लिक्विडीटी रेट असे आहे. ज्या दरांवर बँका आपली ठराविक रक्कम सरकारकडे ठेवतात त्यालाच एसएलआर असे म्हटले जाते. बाजारात नकद किंवा रोख रक्कम नियंत्रित ठेवण्यासाठी हा आणखी एक उपाय मानसा जातो.

Repo Rate
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट वाढवला; गृहकर्ज, वाहन कर्ज महागणार

काय म्हणाले गव्हर्नर

रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये वाढ केल्यानं होमलोनच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. मे २०२२ मध्ये जेव्हा ४ टक्के रेपो रेट होता त्यात आता वाढ होऊन ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षात जागतीक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामानुसार जगभरातील मध्यवर्ती बँकांना व्याजदार वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. महागाईवर नियंत्रणासाठी हे कठीण निर्णय घेणं महत्त्वाचे असल्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com