कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला 10 दिवसांची NIA कोठडी, कोर्टाचा महत्वपूर्ण आदेश I Sidhu Musewala Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sidhu Musewala Murder Case

मुसेवालाच्या हत्येमागं परदेशी कनेक्शन असल्याचं एजन्सीनं न्यायालयाला सांगितलं.

Sidhu Musewala Case : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला 10 दिवसांची NIA कोठडी, कोर्टाचा महत्वपूर्ण आदेश

सिध्दू मुसेवाला हत्याकांडातील (Sidhu Musewala Murder Case) आरोपी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सज्ज झालीय. आता लॉरेन्स बिश्नोईला 10 दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवण्याचे आदेश दिल्ली न्यायालयानं गुरुवारी दिले.

हेही वाचा: Political News : वंचित बहुजन आघाडी-राष्ट्रवादीची युती होणार? प्रकाश आंबेडकरांबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

एनआयएनं कोर्टात 12 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मुसेवालाच्या हत्येमागं परदेशी कनेक्शन असल्याचं एजन्सीनं न्यायालयाला सांगितलं. त्यामुळंच लॉरेन्सला चौकशीसाठी ताब्यात घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या खून प्रकरणात आता अनेक गुपितं उघड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

एनआयएनं बुधवारी लॉरेन्स बिश्नोईला (Lawrence Bishnoi) पंजाबमधील भटिंडा तुरुंगातून (Bathinda Jail) अटक केली. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिश्नोईचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन ही कारवाई करण्यात आली. एनआयएला या प्रकरणी अनेक सूचना मिळाल्या असून त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात येत आहे. प्रत्यक्षात तपास यंत्रणेनं या वर्षी मार्चमध्ये एका मोबाईल क्रमांकाबाबत माहिती मिळवली. हा क्रमांक कुख्यात दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनशी (Indian Mujahideen) संबंधित दहशतवाद्यांचा होता, जो दिल्लीच्या तिहार तुरुंगात वापरला जात होता. अशी माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.