#RepublicDay2020 : राजपथावर भारतीय संस्कृती व लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन

वृत्तसंस्था
Sunday, 26 January 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा परंपरा मोडीत काढत अमर जवान ज्योती ऐवजी राष्ट्रीय युद्ध स्मारक (वॉर मेमोरियल) येथे जाऊन हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. ब्राझीलचे अध्यक्ष जेर मेस्सियास बोल्सोनारो हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते.

नवी दिल्ली : भारताच्या लष्करी व सांस्कृतिक सामर्थ्याचे प्रदर्शन आज (रविवार) 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पथसंचलनात पाहायला मिळाले. भारताची आन, बान, शान काय आहे, याचे दर्शन संपूर्ण जगाला यानिमित्त दिसले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा परंपरा मोडीत काढत अमर जवान ज्योती ऐवजी राष्ट्रीय युद्ध स्मारक (वॉर मेमोरियल) येथे जाऊन हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. ब्राझीलचे अध्यक्ष जेर मेस्सियास बोल्सोनारो हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. ब्राझीलच्या निमित्ताने दक्षिण अमेरिका खंडातील देशांशी संबंध वृद्धिंगत करण्यास भारताने प्राधान्य दिले असून, त्या अंतर्गत ब्राझीलच्या अध्यक्षांना प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्यासमवेत येणाऱ्या शिष्टमंडळात सात मंत्री, तेथील संसदेतील ब्राझील-भारत मैत्री गटाचे प्रमुख तसेच अधिकारी आणि उद्योजकांचाही समावेश होता. 

#RepublicDay2020 : पंतप्रधानांनी सुरु केली नवी परंपरा; अमर जवान ज्योती ऐवजी... 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण करून राजपथावरील या नेत्रदिपक सोहळ्याला सुरवात केली. भारतीय लष्कर, हवाई दल, नौदलातील वेगवेगळ्या रेजिमेंटच्या जवानांनी शक्तींचे प्रदर्शन यावेळी केले. त्यापूर्वी यंदाच्या वर्षीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध राज्यांच्या चित्ररथांनी आपापल्या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन यावेळी उपस्थितांनी घडविले. तर, हवाईदलाच्या लढाऊ विमानांनी चित्तथराक प्रात्यक्षिके सादर केली. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळविलेल्या मुलांनीही यावेळी उपस्थिती लावली. दुचाकींवरील प्रात्यक्षिकांनी काळजाचा ठोका चुकविला, विशेष महिला कमांडोंचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी काही अंतर चालत जाऊन नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic Day 2020 Celebration And Parade at Rajpath in New Delhi