Republic day 2023 : पूर्वी फक्त 'राजा'च राजपथवरुन जायचा, जाणून घ्या अनोखा इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Republic day 2023

Republic day 2023 : पूर्वी फक्त 'राजा'च राजपथवरुन जायचा, जाणून घ्या अनोखा इतिहास

Republic day 2023 : आज २६ जानेवारी, आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन. यंदाचा प्रजासत्ताक दिवस खूप असणार आहे कारण या 74 व्या प्रजासत्ताक दिनी 'स्वदेशी' चा गौरव होणार आहे. या प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये प्रदर्शनादरम्यान सैनिक स्वदेशी म्हणजेच मेड इन इंडियाचे शस्त्र वापरणार आहे.

सुरक्षा निर्मिती क्षेत्रात आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहीत करण्याचा हा मार्ग आहे. या वेळी 21 पिस्तुलांनी सलामी भारतात बनलेल्या 105 एमएमच्या इंडियन फील्ड गन्सद्वारे दिली जाणार. ( Republic day 2023 know history about rajpath read story)

याशिवाय राजपथावर अग्निवीरशिवाय इजिप्तच्या सैन्याची तुकडी ही दिसणार. मुख्य पाहूणे इजिप्तचे राष्ट्रपती अब्दल फतह एल-सीसी असणार आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडवर फक्त आपल्या देशाचं नाही तर संपूर्ण जगाच लक्ष असतं.

हेही वाचा: NDA Parade मध्ये चेतक, चित्ता आणि सुखोई विमानांची सलामी

प्रजासत्ताक दिनी राजपथवर परेड कधी सुरू झाली आणि त्याच्याशी संबंधित इतिहास काय आहेत हे देखील जाणून घेऊया…

राजपथ हा किंग्सवे होता

आज आपण ज्या रस्त्याला राजपथ म्हणून ओळखतो तो एकेकाळी किंग्सवे असायचा. जिथे फक्त राजांनाच जाण्याची परवानगी होती. म्हणजेच ब्रिटीशांच्या काळात या मार्गावरून केवळ ब्रिटिश राज्यकर्त्यांचे महत्त्वाचे अधिकारी जात असत. इंग्रजांनी किंग जॉर्ज पंचम यांच्या सन्मानार्थ राजपथ किंग्सवे असे नाव दिले.

जो 1911 मध्ये दिल्ली दरबारमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. त्याच दिवशी दिल्ली ही भारताची राजधानी बनली. त्यापूर्वी कोलकाता ही भारताची राजधानी होती. यावेळी या किंग्सवेचाअर्थ राजाचा मार्ग असा होता.

हेही वाचा: Republic Day Parade : राजपथावरील संचलनात नाशिकची दुर्गेशनंदिनी

राजपथचा इतिहास

इंग्रजांपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात अनेक सुधारणा झाल्या. इंग्रजांचे गुणगान करणाऱ्या ठिकाणांची नावे बदलून अनेक ठिकाणे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली. यामध्ये राजपथचाही समावेश होता.

947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. 1955 मध्ये त्यांनी या किंग्सवेचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे नाव राजपथ ठेवण्यात आले. 1955 पूर्वी, याचे नाव फक्त किंग्सवे होते. त्याचे नाव राज अर्थात लोकशाहीशी जोडले गेले.

हेही वाचा: Republic Day Parade : पॅसेंजर ड्रोनपासून नारी शक्तीपर्यंत; जाणून घ्या 74 व्या प्रजासत्ताक दिनी काय असणार खास?

राजपथ कुठे आहे?

जर आपण राजपथबद्दल बोललो, तर ते रायसीना हिल्सवर असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या गेटपासून सुरू होते आणि विजय चौकापासून नॅशनल स्टेडियमपर्यंत जाते. त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर हिरवळ आहे, बागा आहेत आणि छोटे तलावही आहेत.

मात्र, येथे सेंट्रल व्हिस्टाचे काम सुरू आहे. राजपथसोबतच केंद्र सरकार सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नावही बदलण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मार्ग सुमारे 3 किलोमीटरचा आहे. या मार्गावरून गेल्यावरच प्रजासत्ताक दिनाची परेड काढली जाते.

हेही वाचा: Republic Day Special Recipe : खास प्रजासत्ताकदिनी नाश्त्याला बनवा तिरंगा पोहे

राजपथावर परेड केव्हापासून होते?

1950 ची पहिली प्रजासत्ताक दिनाची परेड आयर्विन स्टेडियमवर झाली होती, जे आज नॅशनल स्टेडियम म्हणून ओळखले जाते. त्याच वेळी, 1955 पासून, राजपथ 26 जानेवारीच्या परेडचे कायमचे ठिकाण बनले. त्यानंतर प्रत्येक प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला राजपथावर मोठ्या थाटामाटात केला जातो.

1955 मध्ये, राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट हा 3 किमीचा राजपथ नवीन आणि भव्य स्वरूपात पूर्ण करण्यात आला, त्यानंतर येथे परेड काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Republic DayHistory