Republic Day Parade 2024
Republic Day Parade 2024esakal

Republic Day Parade 2024 : मोटरसायकलवर उभे राहून CRPF महिला पोलीसांची तलवारबाजी! परेडमध्ये कर्तव्यपथावर दिसली नारी शक्ती

देशात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर भारताच्या तिन्ही सैन्यदलांतर्फे शक्तिप्रदर्शन आणि पथसंचलन केले जाते.
Published on

Republic Day Parade 2024 : देशात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर भारताच्या तिन्ही सैन्यदलांतर्फे शक्तिप्रदर्शन आणि पथसंचलन केले जाते.

हे पथसंचलन झाल्यानंतर देशातील विविध राज्यांच्या चित्ररथांचे पथसंचलन केले जाते. या चित्ररथांमधून प्रत्येक राज्याच्या परंपरेची, इतिहासाची झलक पहायला मिळते. चित्ररथांच्या संचलनानंतर तिन्ही सैन्य दलांमधील पुरूष आणि महिला तुकडीतर्फे विविध प्रात्याक्षिकांमधून शौर्य आणि त्यांच्या पराक्रमाचे प्रदर्शन दाखवले जााते.

Republic Day Parade 2024
Republic Day Parade 2024 : चिपळूणचे विघ्नहर्ता महिला वादक पथक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आघाडीला

नुकतेच दिल्लीतील कर्तव्य पथावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ‘नारी शक्तीचे’ पराक्रम दाखवत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे. या २६५ महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलवर उभे राहून शौर्य आणि चित्तथरारक पराक्रमाचे प्रदर्शन केले.

यावेळी महिला पोलीस कर्मचारी मोटारसायकलवर स्वार होऊन हातात रायफल्स, तलवार, कॅमेरा आणि लॅपटॉप हाताळताना दिसून आल्या. एकूणच या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी नारी शक्तीचे दर्शन त्यांच्या चित्तथरारक शैलींमधून घडवले आणि उपस्थितांची मने जिंकून घेतली. या संदर्भातील व्हिडिओ एएनआयने एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे.

Republic Day Parade 2024
Republic Day 2024 Parade : कर्तव्यपथावर उतरलं चांद्रयान-3; इस्रोच्या चित्ररथातून पुन्हा दिसला ऐतिहासिक क्षण! पाहा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com