

Security forces remain on high alert in Delhi and other major cities following intelligence warnings of potential terror threats ahead of Republic Day.
esakal
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटानंतर गुप्तचर यंत्रणांनी प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये बांगलादेशी दहशतवाद्यांकडून हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा जारी केला आहे. बांगलादेशी दहशतवादी संघटना आणि खलिस्तान समर्थक संघटना घातपाताचा कट रचत आहेत, असा इशारा एजन्सींकडून देण्यात आला आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील सुरक्षा संस्थांना सतर्क राहण्याचे आणि या दहशतवादी संघटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.