प्रजासत्ताक दिनाचे ट्रम्प यांना निमंत्रण 

यूएनआय
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली/वॉशिंग्टन (यूएनआय) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठविले असल्याचे आज स्पष्ट झाले. मात्र ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची तारीख 'टू प्लस टू' बैठकीत निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासंबंधी भारताचे पाठविलेले निमंत्रण ट्रम्प यांना मिळाले असून, पुढील महिन्यात दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र तसेच संरक्षण मंत्र्यांच्या 'टू प्लस टू' बैठकीत त्यांच्या दौऱ्याची तारीख निश्‍चित करण्याविषयी चर्चा होईल. 

अमेरिकी अध्यक्षांचे माध्यम सचिव सारा सॅंडर्स यांनी व्हाइट हाउसच्य नियमित पत्रकार परिषदेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले, की मला माहीत आहे, की निमंत्रण आले आहे. मात्र त्यावर कोणताही अंतिम निर्णय घेतला गेला आहे असे मला वाटत नाही. मला हेसुद्धा माहीत आहे, की संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस आणि परराष्ट्र मंत्री मायकल पोम्पियोपुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर जात आहे आणि ते चर्चेची प्रक्रिया सुरू करतील, तसेच या वर्षीच्या अध्यक्षांच्या दौऱ्याच्या शक्‍यतेवर चर्चा होण्याचीही शक्‍यता आहे. 

Web Title: Republic Day of the Trump Invitation