भारतीय विज्ञान संस्थेमध्ये स्फोट; एका संशोधकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

बंगळुरूमध्ये असलेल्या भारतीय विज्ञान संस्थेच्या (आयआयएस) एरोस्पेस प्रयोगशाळेत आज (ता.05) बुधवारी एका हायड्रोजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. याची तीव्रता इतकी भयानक होती की यात एका वैज्ञानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर या स्फोटामध्ये आणखी तिघेजण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

बंगळूरू- बंगळुरूमध्ये असलेल्या भारतीय विज्ञान संस्थेच्या (आयआयएस) एरोस्पेस प्रयोगशाळेत आज (ता.05) बुधवारी एका हायड्रोजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. याची तीव्रता इतकी भयानक होती की यात एका वैज्ञानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर या स्फोटामध्ये आणखी तिघेजण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, येथील प्रयोगशाळेत दुपारनंतर साधारणतः 2.30 च्या सुमारास एक संशयास्पद हायड्रोजन सिलिंडरचा स्फोट झाला असून यामध्ये इतर संशोधकांना गंभीर जखमा झाल्या आहेत. या स्फोटामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या संशोधकाचे नाव मनोज कुमार (वय 30) असे आहे.

स्फोट झाल्यावर मनोज कुमारचा जागीच मृत्यू झाला तर, त्याच्यासोबत असलेले आणखी तीन संशोधक अतुल्य, कार्तिक आणि नरेश कुमार हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सदाशिवनगर पोलिस करत आहेत.

Web Title: Researcher killed in IISc lab shockwave 'explosion', three others injured seriously