rahul gandhi
sakal
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करत राजधानीतील राजकीय वातावरण तापविणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली. ‘‘अकार्यक्षम शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ज्या दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला, त्यांच्यावर कठोर कारवाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माफी, या देशभरातील विद्यार्थ्यांच्या तीन मागण्यांचे आपण पूर्ण समर्थन करीत असून त्यावर कुठलीही तडजोड होणार नाही,’’ अशी भूमिका त्यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.