ओडिशाचा आरोग्यमंत्र्यांचा अखेर राजीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

रुग्णालय आग प्रकरण; मृतांची संख्या 25 वर
भुवनेश्‍वर - ओडिशाचे आरोग्यमंत्री अतनु सब्यासची नायक यांनी आज मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याकडे राजीनामा सोपविला. एसयूएम रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत पावलेल्या रुग्णांची संख्या 25 वर पोचल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिल्याचे समजते.

आज चार रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असताना श्‍वसनात विषारी वायू आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. सोमवारी या घटनेत 21 रुग्ण गुदमरून मेले होते, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. त्यातच रुग्णांना बाहेर काढण्यास प्रशासनाने बराच विलंब केल्याने मृतांची संख्या वाढल्याचे मत प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केले होते. दरम्यान, रुग्णालयाचे प्रमुख मनोज रंजन नायक यांनी गुरुवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर आज त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

Web Title: resignation of odisha health minister