अंकलीच्या शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वांचे आळंदी प्रस्थान

अंकलीच्या शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वांचे आळंदी प्रस्थान

अंकली  - येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा यांनी आज अंकलीतून आळंदीला प्रस्थान केले. 300 किमी अंतराचा प्रवास करून हे अश्व आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार आहेत. 

अश्व प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अंकलीकर शितोळे-सरकार यांच्या वाड्यात सकाळी 9 वाजता अंबाबाई मंदिरात पूजन व आरती झाली त्यानतंर जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. दोन्ही अश्वांचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे-सरकार व महादजीराजे शितोळे-सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दिंडी व दोन्ही अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी ओवाळणी करून दर्शन घेतले. गावातील पारंपरिक मार्गावरून मिरवणूक वेशीत आल्यानंतर अश्वांना निरोप देण्यात आला.

याप्रसंगी आळंदीहून दिंडीचे मालक बाळासाहेब आरफळकर-पवार, माऊली गुळूंजकर, सत्यवान बवले, संजय बवले, अजित मधवे, तर कोथरूड पुणे येथून शंकर मोकाटे, विजय मोकाटे, सचिन तिकोणे, राजाभाऊ थोरात, मोरेश्वर गायकवाड, अतूल नाझरे, बसवप्रसाद जोल्ले, शिवराज जोल्ले, अश्वथ शितोळे-सरकार, तुकाराम पाटील, संजय चौधरी, विवेक कमते यांच्यासह अंकली, जुगूळ, चंदूर, मांजरीवाडी, काडापूर, परीसरातील वारकरी उपस्थित होते. 

रिंगण सोहळ्याचे आकर्षण असलेले माऊलींचे अश्व 300 किमीचा प्रवास करून तेथून पुढे आळंदी ते पंढरपूर वारीस निघणार आहेत. 187 वर्षाची शितोळे घराण्याची परंपरा व माऊलीची सेवा करण्यास सज्ज झाले असून नियोजन बध्द हा कार्यक्रम पार पडणार आहे.

-  श्रीमंत उर्जितसिंहराजे शितोळे सरकार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com