पाकीस्तानच्या गोळीबाराला जशास तशे उत्तर द्या - गृहमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

पहिल्यांदा आपल्याकडून गोळीबार नको, परंतु, समोरून गोळीबार झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर द्या. गोळीबार झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे आपल्या जवानांना चांगलंच माहिती आहे. आपल्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने बघता कामा नये. याबाबत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना कोणीही कसल्याही प्रकारची  विचारणा करणार नाही.

जम्मू कश्मीर - जम्मू कश्मीरमध्ये पाकीस्तानकडून सातत्याने होत असलेल्या  गोळीबाराला जशास तसे उत्तर द्यायला हवे, असे आदेशच केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी  सीमा सुरक्षा दलाला दिले आहेत. पाकीस्तानला शांतता नकोय. त्यांच्या कडून कुठल्याही प्रकारे केल्या जाणाऱया कारवाया कमी होत नाहीत असेही ते यावेळी म्हणाले. 

भारतीय  जवांनानी केलेल्या कारवाईमुळे पाकीस्तानी सैन्याने घाबरुन गोळीबार थांबवण्याची विनंती केली होती. परंतु, पाकीस्तानच्या कारवाया सुरुच आहेत. पाकीस्तानी सैन्य सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे. या नापाक कारवायांवर राजनाथ सिंह यांनी संताप व्यक्त करत एकप्रकारे पाकीस्तानला इशाराच दिला आहे. ते सीमा सुरक्षा दलाच्या कार्यक्रमात बोलत होते.

पहिल्यांदा आपल्याकडून गोळीबार नको, परंतु, समोरून गोळीबार झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर द्या. गोळीबार झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे आपल्या जवानांना चांगलंच माहिती आहे. आपल्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने बघता कामा नये. याबाबत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना कोणीही कसल्याही प्रकारची  विचारणा करणार नाही, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले.

Web Title: Respond to the firing of Pakistan says Home Minister